पाहा पूजा हेगडे आणि प्रभासचा रोमँटिक अंदाज

प्रभासचा लवकरच ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे आणि प्रभास यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.पूजा हेगडेने सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

या पोस्टरमध्ये प्रभास आणि पूजाचा रोमँटिंक अंदाजात दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच प्रभासने देखील सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत, ‘माझ्या चाहत्यांसाठी खास गिफ्ट. मला आशा आहे की तुम्हाला हे आवडेल’ असे म्हटले आहे.

राधा कृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा आगामी चित्रपट एक बिग बजेट चित्रपट असून आंतरराष्ट्रीय भागातील प्रमुख भागांमध्ये या चित्रपटाची शूटिंग झाली आहे.हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी या चार भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

You might also like