ईशासाठी विक्रांतने मनाचं दार तर उघडलं पण वरच्या खोलीचं दार उघडेल का विक्रांत ?

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेला नुकतेच विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. मात्र या सरंजामेंच्या अलिशान घरातील एक खोली रहस्यमय आहे. या खोलीत काय आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

लग्नाच्या आधीपासून विक्रांत एका खोलीत जाऊन बराच वेळ व्यतित करतो, हे पाहायला मिळाले. लग्नाच्या दिवशी ईशा त्या खोलीचे दार वाजवते म्हणून विक्रांत तिच्यावर चिडतो आणि तिला हा दरवाजा वाजवायचा नाही, असे सांगतो. त्यामुळे ईशादेखील ह्या खोलीत काय असे आहे जे विक्रांत सरांनी माझ्यापासून लपवले आहे, हा प्रश्न पडतो.

मात्र आता या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर दाखल झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यावर या खोलीतील रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमधील आणखीन वाढली आहे. मात्र आता लवकरच विक्रांतच्या ह्या खोलीतील रहस्य लवकरच उघडकीस येणार आहे. या खोलीतील रहस्य जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like