‘ससुराल सिमर का’मधील बालकलाकार शिवलेख सिंग याचा अपघातात मृत्यू

‘ससुराल सिमर का’मधील बालकलाकार शिवलेख सिंग याचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात शिवलेखचे आई-वडील व त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रायपूर येथील धारसिवा परिसरात गुरुवारी शिवलेखच्या कारचा अपघात झाला. दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की शिवलेखचा जागीच मृत्यू झाला. त्याची आई गंभीर जखमी आहे. वडीलव त्यांच्यासोबत असलेले नवीन सिंगसुद्धा जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ट्रकचा ड्राइव्हर गाडी घटनास्थळीच सोडून पळाला. ड्राइव्हरचा शोध पोलीस घेत आहेत. शिवलेखच्या अकस्मात मृत्यूने कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.