सरोज खान यांनी माधुरी दिक्षितचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल…

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान सरोज खान यांचा अभिनेत्री माधुरी दिक्षितसोबत डान्स करतानाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘एक दो तीन’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिनाच्या निमित्ताने माधुरीने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. माधुरी सरोज खान यांच्या सर्वात आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक होती. दोघांनी ‘एक दो तीन’ या गाण्यावर डान्स केला होता. माधुरीच्या करिअरमधील हे सुपरहिट गाणं होतं. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती.

You might also like