साराच्या ड्रायव्हरला कोरोना, सारासह कुटुंबियांची चाचणी आली…

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तरीही कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस आणखी वाढ होत चालली आहे. राज्यात तब्बल 6 हजार 497 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 लाख 60 हजार 924 वर पोहोचला आहे.
तर गेल्या २४ तासात राज्यात 4 हजार 182 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 1 लाख 44 हजार 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 1 लाख 05 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.38 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
अभिनेत्री सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने साराच्या संपूर्ण कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली.
सारा अली खानच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मुंबई पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर तिची आई अभिनेत्री अमृता सिंग, इब्राहिम अली खान, सारा अली खान आणि इतर लोकांच्या टेस्ट करण्यात आली. सुदैवाने या सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती साराने दिली आहे.