बहीण ‘सारा’ने घेतली बेबी ‘तैमूर’ची जागा

आज तैमुर कोण्या बड्या सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. सगळ्या स्टारकिड्सच्या लोकप्रियतेच्या यादीत तैमुरचे नाव हे आघाडीवर आहे. इतकेच नव्हेतर लोकप्रियतेच्या यादीत बॉलिवूडच्या सगळ्याच स्टार्सनाही तैमुरने मागे टाकले आहे इतकी त्याची लोकप्रियता आहे. पण आता तैमूरला आता कुटुंबातील एका सदस्याला मागे टाकलं आहे.

ती सदस्या म्हणजे सारा अली खान आहे. साराचा फॅनफॉलोअर्स कमालीचा वाढला आहे. या लोकप्रियतेमध्ये तिने तैमूर मागे टाकलं आहे.

सारा अली खान आणि तैमूर दोन्ही स्टार किड्स गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. तैमुर अली खान आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियाचा लाडका आहे. तर सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून आपल्या बॉलिवूड डेब्यूमुळे मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामुळे लोकप्रियतेमध्ये साराने तैमुरवर मात केली आहे.

सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत साराचा समावेश करण्यात आला. ‘टॉक ऑफ दि टाऊन स्टार किड्स’च्या लोकप्रियतेची तुलना स्कोर ट्रेंड्स इंडियाने केल्यावर जी आकडेवारी समोर आलीय त्यानुसार, डिजिटल न्यूज, न्यूजपेपर आणि वायरल न्यूजमध्ये १०० गुणांसह सारा अली खान पुढे आहे. तर ‘बेबी तैमूर’ने डिजिटल न्यूजमध्ये केवळ ४ टक्के, न्यूजपेपर कव्हरेजमध्ये १२ टक्के आणि व्हायरल न्यूजमध्ये ४२ टक्के गुण मिळाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like