साराने आईचे घर सोडण्याबद्दल केला मोठा खुलासा

सारा अली खान आपल्या आईचे घर सोडून नव्या घरात राहायला गेली, अशा बातम्या गेल्या काही दिवसं पासून चर्चेत आहेत. सारा आईचे घर सोडून जात असल्याचे फोटोही व्हायरल झालेत.
खुद्द सारानेही तिच्या सोशल हँडलवर एक फोटो शेअर केला होता. ‘एक नई शुरुवात’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते. हा फोटो आणि त्याचे कॅप्शन पाहून तर साराने आईचे घर सोडले, हे पक्के मानले गेले होते.
पण आता खुद्द साराने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. मी आईचे घर सोडलेले नाही, असे तिने सांगितले. बॉम्बे टाईम्सशी बोलताना तिने हा खुलासा केला. मी आईचे घर सोडलेले नाही. ते फोटो, ते सामान शिफ्टिंग सगळे काही एका जाहिरातीचा भाग होते. मी एका जाहिरातीचे शूट करत होते. सोशल मीडियावरची माझी पोस्ट केवळ आणि केवळ अॅड कॅम्पेनचा भाग होता. मी आईला कधीच नाराज करू शकत नाही. तिच्याशिवाय मी राहूच शकत नाही, असे सारा म्हणाली.
https://www.instagram.com/p/BuBwhlbgJHE/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या –