रियाने उघड केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीचा समावेश?

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशियतरिया चक्रवर्ती हिला ड्रग्स सेवनासह अन्य आरोपांखाली अटक करण्यात आली. एनसीबीने ही कारवाई केली. त्यापूर्वी झालेल्या चौकशीमध्ये रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
या चौकशीमध्ये रियाने २५ बड्या कलाकारांची नावं घेतली होती. यात सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांचा समावेश असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रियाला अटक करण्यापूर्वी एनसीबीने तिची चौकशी केली होती. या चौकशीमध्ये तिने बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांविषयी काही खुलासे केले होते. तसंच २५ बड्या कलाकारांची नावंदेखील घेतली होती.
यामध्येच आता सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायन सिमोन खंबाटा यांची नावं समोर आली आहे. त्यामुळे एनसीबी आता या तिघींविरोधात पुरावे गोळा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच या ड्रग्स रॅकेटमध्ये कलाविश्वातील कोणत्या व्यक्तींचा समावेश आहे, हे ड्रग्स कुठून येतात, ते कोणाला पुरवले जातात, अशा अनेक प्रश्नांची उत्तर रियाने दिली आहे, असं एनसीबीने न्यायालयात सांगितलं होतं.