अभिनेत्री सारा अली खान एनसीबी कार्यालयात दाखल

ड्रग्स प्रकरणी सारा अली खानची चौकशी होणार आहे. त्यामुळे  दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्या पाठोपाठ सारा देखील एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. त्यामुळे आज दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी करणार असल्याचं दिसून येत आहे.

एनसीबीने बुधवारी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, शुक्रवारी  रकुल प्रीतची चौकशी झाली असून आज दीपिका, सारा आणि श्रद्धाची चौकशी होणार आहे. सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशी दरम्यान साराच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यामुळे एनसीबी तिची चौकशी करणार आहे.

You might also like