सुशांतच्या वडिलांबद्दलच्या दाव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली खरी पण केलेल्या दाव्यामुळे वाद पेटला होता. त्यामुळे संजय राऊत यांनी आता ‘आमची काही चूक झाली तर मी माफी मागेल’, अशी भूमिकाच राऊतांनी स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामध्ये संजय राऊत यांनी सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांबद्दल अजब दावा केला होता. त्यानंतर राजपूत कुटुंबीयांनी त्यांचा दावा खोडून काढला होता. एवढंच नाहीतर संजय राऊत यांना नोटीसही बजावण्यात आली होती.

आज पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, ‘आम्हाला 50/200 नोटीस येत राहतात. मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे, ते माहिती नाही. मी संवेदनशील व्यक्ती आहे. मला जर वाटलं की, आमची काही चूक झाली तर मी माफी मागेल. मी माझ्या माहितीच्या आधारे बोललो आहे. त्यांचा परिवार त्यांच्या माहितीच्या आधारे बिहारमधून आरोप करत आहे.’

 

You might also like