संजय नार्वेकर दिसणार ‘या’ मालिकेत

सोनी सब वाहिनीवर लवकरच ‘माय नेम इज लखन’ ही मालिका आपल्या भेटीला येत आहे. या मालिकेत संजय नार्वेकर लकी भाईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एका तरुणाने सुधारणेच्या मार्गावर जाण्याच्या केलेल्या प्रयत्नांची कथा पाहायला मिळणार आहे.

‘माय नेम इज लखन’ ही मालिका म्हणजे नव्याने आयुष्य सुरु करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखनचा प्रवास आहे. आपल्या या नव्या मार्गावरुन प्रवास करताना आपल्या स्वतःच्या अंदाजात चांगल्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नांत अनेकदा विनोदी प्रसंग निर्माण होतात. या मालिकेतून श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. श्रेयस लखनच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचे प्रिमीयर २६ जानेवारी रोजी सादर होणार असून शनिवार आणि रविवार, सोनी सबवर सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like