जबाब नोंदवण्यासाठी संजय लिला भंसाली पोहचले वांद्रे पोलीस स्थानकात

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भंसाली त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचले आहेत. भंसाली पोलीस स्थानकात संपूर्ण टीमसोबत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार असे ही सांगण्यात आले होते की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणे संजय लीला भंसाली यांची चौकशी केली जाऊ शकते.
वांद्रे पोलीस स्थानकात पोहचण्यापूर्वी भंसाली त्यांच्या जुहू स्थित कार्यालयात गेले होते. त्यांनी कार्यालयात त्यांच्या टीमसोबत या प्रकरणी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. भंसाली यांनी गाडीत बसूनच त्यांच्या टीमसोबत चर्चा केली.
सुशांत आणि संजय लीला भंसाली यांनी एकाही चित्रपटासाठी एकत्रितपणे कधीच काम केलेले नाही. तरीही भंसाली यांची सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. खरंतर भंसाली यांनी दोन चित्रपटांमधून सुशांतला देण्यात आलेली मुख्य कलाकाराची भुमिका दिल्यानंतर काढून टाकले होते.