संजय जाधवच्या ‘लकी’ चित्रपटाचे ‘कोप्चा’ गाणे प्रदर्शित…..

संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर काही दिवसा पूर्वी सोशल मीडियावरून रिलीज झाले. त्यानंतर आता या चित्रपटाचे नवीन गाणे कोप्चा नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
अभय महाजन आणि दिप्ती सती यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. संजय जाधव म्हणाले, “व्हॅलेंटाईन्सच्या महिन्यात रिलीज होणारा आमचा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा तरूणाईला खूप आवडेल, असा आमचा विश्वास आहे. तुमच्या संपूर्ण कुटूंबासोबत तुम्ही हा सिनेमा पाहू शकाल आणि तुमचं दोन तास भरपूर मनोरंजन होईल, याचा मला विश्वास आहे.”संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला ‘लकी’ ७ फेब्रुवारी २०१९ ला रिलीज होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –