संजय दत्तचा ‘बाबा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…..

‘बाबा’ या चित्रपटातून संजय दत्त मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘बाबा’ या चित्रपटात दीपक डोब्रियाल, नंदिता पाटकर, स्पृहा जोशी, अभिजीत खांडकेकर, बालकलाकार आर्यन मेघाजी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शंकर या लहान मुलाची भावनिक कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे.

खेडेगावातल्या एका गरीब कुटुंबात शंकर राहत असतो. आई-वडीलांना बोलता येत नाही पण छोट्याशा कुटुंबात ते खूश असतात. अचानक एके दिवशी शहरातील दाम्पत्य शंकरला आपला मुलगा असल्याचं म्हणत त्याला घेऊन जाण्यासाठी येतात. इथून पुढे शंकरच्या आईवडिलांचा लढा सुरू होतो.  २ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like