संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव

संजय चौधरीसोबत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी जात असताना एका अज्ञात इसमाने त्याची लूट केली आहे. पोलिसांची धमकी देत या इसमाने त्याच्या जवळील पैसे लंपास केला आहे. संजयने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

“मी दुपारी २.३० च्या दरम्यान मीरा रोड येथून नायगावला मालिकेच्या सेटवर निघालो होतो. त्यावेळी एक व्यक्ती बाईकवर आला आणि जोरजोरात माझ्या गाडीची काच वाजवू लागला.सोबतच तो अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करत होतो. त्याने मला गाडी बाजूला घेण्यास सांगितली. त्यावेळी माझ्या गाडीमुळे त्या इसमाला स्पर्शदेखील झाला नाहीये तरी हा असं का सांगतो याचा विचार मी करत होतो”, असं संजय म्हणाला.

“गाडी बाजूला घेतल्यानंतर या इसमाने मला गाडीची काच खाली घ्यायला सांगितली. त्यावर मी काच खाली केली तर या इसमाने खिडकीतून हात आतमध्ये टाकत गाडीचा दरवाजा उघडला आणि तो गाडीत येऊन बसला. त्यानंतर त्याने माझा फोन घेतला आणि तू मला मारलंस. माझं खूप नुकसान झालं आहे, असा खोटा आरोप माझ्यावर केला.

त्याचवेळी त्याला साथ द्यायला आणखी २-४ जण तिथे आले आणि आताच्या आता मला एटीएममधून २० हजार रुपये काढून दे असं त्यांनी मला सांगितलं. त्याच वेळी माझ्या एटीएममध्ये पैसे नाहीत असं मी सांगितल्यावर त्यांनी मला पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी माझ्या पाकिटात जितके पैसे होते ते सगळे काढून घेतले आणि माझा फोन परत करत निघून गेले”. असेही संजय चौधरी याने सांगिले आहे.

You might also like