समीरा रेड्डी दुस-यांदा देणार गुड न्यूज

समीरा रेड्डी दुस-यांदा आई होणार आहे. काल रात्री समीरा लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. यावेळी तिने बेबी बम्पसोबत कॅमे-याला अनेक पोज दिल्या. प्रेग्नंसीनंतर समीरा पहिल्यांदा पब्लिक इव्हेंटमध्ये दिसली.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत तिने प्रेग्नंसीच्या वृत्ताला दुजोरा दिला. हो मी दुस-यांदा आई होणार आहे. मी चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. २०१९ मध्ये आम्हाला दुसरे बाळ व्हावे, अशी माझी व अक्षयची इच्छा होती. जुलैमध्ये मी बाळाला जन्म देईल. यामुळे मी अनेक प्रोजेक्ट नाकारले, असे समीराने यावेळी सांगितले.

२१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक आणि ‘वेर्देची’ या सुपरबाईक्स कंपनीचा मालक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.

 

https://www.instagram.com/p/BtTeQgIj6i-/?utm_source=ig_web_copy_link

 

महत्वाच्या बातम्या –