सलमानसोबत लग्नाचा कसलाही विचार नाही : लूलिया

भिनेता सलमान खानचं लग्न चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कथित गर्लफ्रेंड लूलिया वंतूर आणि सलमान नोव्हेंबरमध्ये लग्न करणार, अशी चर्चा होती. आता त्यावर लूलियाने स्वतःच स्पष्टीकरण दिलं आहे.

लूलिया गेल्या सहा महिन्यांपासून सलमानच्या कुटुंबियांसोबत राहत होती. ‘सुलतान’ आणि ‘ट्युबलाईट’च्या सेटवरही सलमान आणि लूलिया आणि सलमान एकत्र दिसले होते. शिवाय अनेक पार्ट्यांमध्येही दोघे एकत्र दिसले. त्यामुळे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान सलमानने या विषयावर कधीही भाष्य केलं नाही. लूलियाने देखील भारतात असताना या विषयावर बोलणं टाळलं. मात्र इटलीमध्ये गेल्यानंतर लूलियाने यावर स्पष्टीकरण दिलं.

You might also like