सलमान ‘बिग बॉस १४’ साठी घेणार इतके कोटी ?

सलमान खान बिग बॉसशोचे सूत्रसंचालन करताना दिसतो. बिग बॉसचे १३ वे पर्व चांगलेच चर्चेत होते. आता बिग बॉसचे १४वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या १४व्या पर्वाचे देखील सलमान खान सूत्रसंचालन करणार असून त्याने त्याच्या मानधनामध्ये वाढ केल्याचे म्हटले जात आहे.

सलमान एका एपिसोडसाठी १६ कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. बिग बॉस १३च्या एका एपिसोडसाठी सलमानने १२ ते १४ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात होते. आता सलमानने त्याच्या मानधनामध्ये वाढ केल्याच्या चर्चा रंगल्या आहे.

सध्या देशात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बिग बॉसच्या घरात काय नवीन पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. बिग बॉस १४मध्ये अभिनेत्री जॅस्मीन भसीन, अलीशा पवार,आरुषि दत्ता, आकांक्षा पुरी, आंचल खुराना, सहिल खान आणि आमिर सिद्धीकी हे कलाकार सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

प्रवीण तरडे यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

You might also like