सलमान खानने दिली प्रजासत्ताक दिनाची खास भेट, पाहा ‘भारत’चा धमाकेदार टीजर

सलमान खानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला. यातील सलमानचा दमदार अ‍ॅक्शन अवतार पाहण्यासारखा आहे. या टीजरमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. अली अब्बासने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्ताला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘भारत’ हा चित्रपट ह्य ऑड टू माई फादरह्ण या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल.

महत्वाच्या बातम्या –

You might also like