‘भारत’च्या सेटवर दिसून आले सलमान खानचे नवीन टॅलेंट

सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत सलमानचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतो आहे. या व्हिडिओत सलमान क्रिकेट खेळताना दिसतोय. घामात भिजलेला सलमान चौकार, षटकार ठोकतोय.
सलमानने सध्या केवळ ‘भारत’वर लक्ष केंद्रीत केले आहे.प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- #MeToo : लैंगिक शोषणाच्या आरोपांवर राजकुमार हिरानींचे स्पष्टीकरण…!
- जॉन-अजय यांच्या सिनेमांची होणार टक्कर
- ‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ इंटरनेटवर लिक
- #MeToo; राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप