सलमानचा ‘बीइंग स्ट्रांग’ फिटनेस व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड दबंग सलमान खान हा इंडस्ट्रीमधील “फिट ऍण्ड हिट स्टार्स’पैकी एक आहे. वयाच्या 54व्या वर्षीही सलमान खानने स्वतःला ज्याप्रकारे फिट ठेवले आहे, ते इतरांसाठी नक्‍कीच प्रेरणादायी आहे. सलमान खान हा सतत त्याच्या बॉडीमुळे चर्चेत असतो. सलमान खानचे कितीही बिझी शेड्यूल असले तरी तो वर्कआउट करण्यास विसरत नाही.

तो दिवसभरातील काही वेळ हा आपल्या फिटनेससाठी देतच असतो. यातच सलमान खान याचा एक वर्कआउटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील त्याचा जबरदस्त वर्कआउट पाहून सर्वजण आश्‍चर्यचकित होत आहेत. सलमान खानने हा वर्कआउट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल आणि ट्‌विटर फीडवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत सलमान वर्कआउट करताना चाहत्यांशीही बोलताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने आपल्या पनवेल फार्महाउसवरील जिमची झलक चाहत्यांशी शेअर केली होती. त्यानंतर आता हा धमाकेदार वर्कआउटचा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. यात सलमान खान पुशअप्सपासून लेकर क्रंचेज आणि हेवी वेट उचलत वर्कआउट करताना दिसतो आहे.

तसेच तो अनेक वेगवेगळया प्रकारचे वर्कआउट करताना दिसतोय. या व्हिडिओला आतापर्यत यूट्यूबवर दीड लाखांहून अधिकवेळा पाहण्यात आले आहे. तर 38 हजारहून अधिक चाहत्यांनी लाइक केले आहे.

 

महत्वाच्या बातम्या:-

 

You might also like