सलमान खानच्या ‘दबंग ३’मध्ये आयटम सॉंगमध्ये दिसणार ‘ही’अभिनेत्री

सलमान खान आता ‘दबंग ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. ‘दबंग ३’ या चित्रपटात सलमान दोन वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटातील आयमट सॉंग ‘मुन्ना बदनमा हुआ’च्या जोरदार चर्चा सुरु असून या सॉंगमध्ये कोणती अभिनेत्री झळकणार याचे देखील अनुमान लावण्यात येत होते.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार या सॉंगमध्ये ‘लव्हयात्री’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी  वरिना हुसेन दिसणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या सॉंगची कोरोग्राफी वैभवी मर्चंड करत आहे. तर साजीद-वाजीद यांनी या सॉंगला संगीतबद्ध केले आहे.

 

You might also like