सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट अडचणीत, नाव बदलण्याची मागणी

‘भारत’ या चित्रपटाविरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ‘भारत’ हे शीर्षक लोकांच्या भावना दुखावणारे असल्याने ते बदलण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

येत्या ५ जून रोजी सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. विपिन त्यागी असं याचिकाकर्त्याचे नाव असून ‘भारत’ हे चित्रपटाचे शीर्षक देऊन कलम ३चे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. कलमाअंतर्गत ‘भारत’ या नावाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकत नाही.

शीर्षकासोबतच याचिकाकर्त्याने चित्रपटातील एका संवादावरही आक्षेप घेतला आहे. सलमान आपल्या नावाची तुलना देशाशी करताना ट्रेलरमध्ये दिसतो. हा संवाद भारतीयांच्या भावना दुखावणारा असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

You might also like