….अशा प्रकारे दिव्यांग चाहतीने काढले सलमानचे चित्र

सलमान खानने एक प्रतिभा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जगासमोर आणली आहे. नुकताच सलमानने त्याच्या एका दिव्यांग चाहतीने काढलेल्या चित्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दिव्यांग चाहतीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये त्या दिव्यांग चाहतीने तिच्या पायाने सलमान खानचे हुबेहूब चित्र मोबाईलमध्ये पाहून काढल्याचे दिसत आहे. सलमान हे चित्र पाहून फार आंनंदी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत सलमानने तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत देवाकडे प्रार्थना केली आहे.