सलमान खान आणि त्याच्या आईचा डान्स पाहिलात काय ?

सलमान खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर आईसोबत नाचतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि सध्या सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. ‘चिप थ्रील्स’ या गाण्यावर सलमान खान व त्याची आई सलमा डान्स करताना या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
मुलासोबतचा डान्स करतानाचे क्षण सलमासुद्धा एन्जॉय करताना दिसत आहेत. डान्सनंतर सलमान आईला मिठी मारतो आणि जेव्हा त्याच्या आईला कळतं हे सगळं व्हिडीओ शूट होत आहे, तेव्हा त्या लगेच शूट करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात, ‘बंद कर हा कॅमेरा’.‘आई म्हणतेय, बंद करा हे नाचगाणं,’ असं कॅप्शन सलमानने या व्हिडीओला दिलं आहे.