असे पूर्ण केले सलमानने ‘बॉटल कॅप चॅलेंज’

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळते. नुकताच सलमान खाननेदेखील हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्याने हे चॅलेंज पूर्ण करत एक महत्वाचा संदेश देखील दिला आहे.
सलमानने त्याच्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करताना व्हिडीओ शेअर केला आहे. पण सलमानने बाटलीवरील झाकण पायाने न काढता एकद मजेशीर अंदाजात काढले आहे. त्याने फूंकर मारून बाटलीवरील झाकण पाडले असून पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. सध्या सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.