अखेर सलमान खान आणि कॅटरिना कैफचे होणार लग्न…!

सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी आजही प्रेक्षकांना फार आवडते. नुकताच सलमानच्या ‘भारत’चा टीझर रिलीज झाला आहे. ज्यानंतर सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता रिपोर्ट नुसार लवकरच ‘भारत’मधले एका गाण्याची शूटिंग करण्यात येणार आहे. ज्यात वेडिंग सीक्वेंस असणार आहे.
‘भारत’ या चित्रपटात सलमान आणि कतरिनाचं लग्न शूट करण्यात येईल. त्यासाठी सध्या शूटिंगची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे ऑफस्क्रीन नाही तरी ऑनस्क्रीन तरी चाहत्यांना त्यांच्या आवडत्या जोडीचं लग्न होताना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटामध्ये सलमान खान, कतरिना कैफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी झळकणार आहेत. ‘भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ हा चित्रपट त्याच्या कथानकासाठी विशेष चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘८३’चित्रपटा मध्ये साहिल खट्टरची वर्णी, साकारणार ‘या’ क्रिकेटरची भूमिका
- ‘बजेट’ मधेही झाला ‘उरी’ चा इफेक्ट; संसदेत How’s The Joshच्या घोषणा
- संजय लीला भन्साळींसाठी करण-अर्जुन येणार एकत्र….!
- ‘हा’ बॉलिवूडचा फिल्ममेकर ‘लकी’ चित्रपटा मधून करतोय मराठीत पदार्पण