मूल की ऑलिम्पिकचं सुवर्णपदक यापैकी तू काय निवडशील ? सायना नेहवाल म्हणते….

सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप या दोघांनी नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या दोघांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या.

लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात झळकले. यावेळी उपस्थितांपैकी एकाने सायनाला आगामी ऑलिम्पिक स्पर्धेविषयी प्रश्न विचारला. मूल की ऑलिम्पिकचं सुवर्णपदक यापैकी तू काय निवडशील असा प्रश्न सायनाला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, ‘मी सध्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे. अद्याप मुलासंदर्भात काही विचार केला नाही. ऑलिम्पिकमधील लक्ष्य गाठण्यासाठी पुढील १० महिने फार महत्त्वाचे आहेत.’ यावर पारुपल्ली कश्यपनेही हसत पुढे म्हटले, ‘जर मूल हवं असेल तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळणार नाही.’