‘या’ विधानामुळे सैफ सोशल मिडियावर झाला ट्रोल

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेपोटिजमचे शिकार झालेले अनेक कलाकार पुढे आले असून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. याच दरम्यान सैफ अली खान याने देखील मोठा खुलासा करत आपण नेपोटिजमचे शिकार झालो आहोत असे सांगितले आहे. त्याच्या या विधानाने सर्वांना अचंबित केले आहे.सैफच्या या विधानानंतर तो सोशल मिडियावर ट्रोल होऊ लागला आहे

“भारतात असमानता आहे, ज्याला बदलण्याची गरज आहे. येथे भाऊ, भाचा, पक्षपात इतकच काय तर विशेष वर्गाला जास्त महत्व देणे आणि ख-या टॅलेंटेड लोकांना मागे ढकलणे असा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. ही आता सर्वसामान्य गोष्ट झाली असून मी ह्या गोष्टीचा शिकार झालो आहे. मात्र मला यात रस नाही. अनेकदा निर्मात्यांना स्टार किड्सच्या वडिलांचा फोन येतो, जेथे याला घेऊ नका असे सांगण्यात येते. यामुळे देखील मला अनेकदा चित्रपटातून काढले आहे. असे सैफ अली खान ने  सांगितले होते. .

 

You might also like