पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची सैफ अली खानने व्यक्त केली इच्छा

अभिनेता सैफ अली खानने एका टॉक शोमध्ये पद्मश्री पुरस्कार परत करण्याबाबत वक्तव्य केलं आहे. शोमध्ये ट्रोलर्सने केलेले मेसेज वाचताना त्याने पद्मश्री पुरस्कार परत करण्याची इच्छा व्यक्त केली.

सैफला वाचण्यास दिलेल्या मेसेजमध्ये ट्रोलरने म्हटलं होतं, ‘सैफ अली खान एक ठग आहे. त्याने पद्मश्री सन्मान विकत घेतला आहे.

यावर सैफ म्हणाला की, मी ठग नाही. पद्मश्री हा पुरस्कार विकत घेतला जाऊ शकतो का? विकत घेणे म्हणजे भारत सरकारला लाच देऊन हा सन्मान मिळवणं इतकी माझी कुवत नाही. तो पुरस्कार खूप मोठा आहे.पण आता पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची माझी इच्छा आहे, असे तो म्हणाला.अभिनेता सैफ अली खानला 2010 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

You might also like