सई ताम्हणकरने शेअर केल्या ‘पाँडेचरी’ मधील काही खास गोष्टी

सई ताम्हणकर लवकरच ‘पाँडीचेरी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नुकतंच ‘पाँडीचेरी’मध्ये चित्रीकरण सुरु झालं असून या चित्रपटातील सईचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोमध्ये सईसोबत  वैभव तत्ववादी देखील झळकला आहे.

‘हा चित्रपट आयफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये माझा लूक हा नॅचरल असून नो मेकअप, नो हेअरस्टाईल असणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीत चित्रीत होणार आहे’, ‘या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेत जात असल्याचा अनुभव येत होता. त्यामुळे या चित्रपटाची संपूर्ण प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. प्रत्येक अभिनेत्रीच्या वाट्याला असा एकतरी चित्रपट यायलाच हवा. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर जाऊन काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता तो अनुभव खूप निराळा आणि मस्त असतो’, असं सई म्हणाली.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like