…..म्हणून प्रभासने ‘साहो’ची रिलीज डेट बदलली

प्रभास आणि श्रद्धा कपूर यांचा आगामी सिनेमा ‘साहो’ची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने बघत आहेत. सिनेमाची घोषणा झाल्यापासून साहो वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत आहे.

मात्र ‘साहो’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा ‘साहो’ 15 ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र आता 30 ऑगस्टपर्यंत प्रेक्षकांना याची वाट पाहावी लागणार आहे.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार 15 ऑगस्टला शारवानंद स्टारर ‘रानारंगम’ आणि अदिवि शेषचा सिनेमा ‘इवारु’ रिलीज होतोय त्यामुळे साहोची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार स्टारर ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’सुद्धा 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

You might also like