‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटामध्ये लागणार सागर देशमुखचा तडका

सागर देशमुख याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सागर आता ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटटामध्ये मध्ये दिसणार असून विधी कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

याबद्दल विधी कासलीवाल म्हणाल्या, “होय, सागर ‘मीडियम स्पाइसी’ चा भाग असून याचा आम्हाला आनंद आहे. या चित्रपटात अनेक मनोरंजक व्यक्तिरेखा असून सागरची व्यक्तिरेखा या कथेचा एक अविभाज्य भाग आहे.’’ शहरी जीवनातील नाते संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाचे चित्रीकरण शेवटच्या टप्प्यात आहे.

 

You might also like