‘सेक्रेड गेम्स २’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर ‘बलिदान देना होगा ‘ प्रदर्शित

बऱ्याच किंबहुना अपेक्षेहून  जास्त प्रतिक्षेनंतर आणि उत्सुकता परिसीमेला पोहोचल्यानंतर अखेर ‘सेक्रेड़ गेम्स २’ या नेटफ्लिक्स ओरिजिनल वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुन्हा एकदा असंख्य प्रश्नांचा काहूर माजवण्याचं काम या ट्रेलरने केलं आहे. त्यामुळे आता कधी एकदा वेब सीरिज प्रदर्शित केली जाते, याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून  राहिली आहे.

‘सेक्रेड गेम्स २’च्या ट्रेलरमध्ये गणेश गायतोंडेचं एक वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. सूट -बूट घातलेल्या ‘गायतोंडे’चा रुबाब पाहता हे सारं नेमकं कसं आणि कधी झालं, याचाच उलगडा सीरिजच्या दुसऱ्या भागातून होणार आहे. १५ ऑगस्टला ही सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळ खऱ्या अर्थाने ‘द वेट इज ओव्हर’ असं म्हणायला हरकत नाही.  प्रभावी आणि प्रेक्षकांच्या पचनी पडतील असे संवाद, पार्श्वसंगीत आणि अर्थातच प्रेक्षकांचा दमदार अभिनय या ट्रेलरला आणखी परिणामकारक ठरवत आहे.

You might also like