‘स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेतं’

अभेनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना आणि कंगणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. कंगनाने ट्विटवर मी ९ सेप्टेंबरला येत आहे काय करायचं ते करा असे विधान केले होते. यावरून कंगनाला धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंगनाला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.’

यावर आता कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. स्वत:चा अजेंडा रेटणाऱ्यांची काळजी भाजपचं सरकार घेत असतं. त्यामुळे अभिनेत्री कंगना राणौतला केंद्राकडून मिळालेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेचं आश्चर्य वाटत नाही अस सचिन सावंत म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपवर जोरदार शरसंधान साधले आहे. केंद्र सरकार कंगनाला आता Y सुरक्षा देत असतील तर ते देशाचं – महाराष्ट्रचे दुर्देव असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय. POK वर विश्वास असलेल्या आणि मुंबई पोलीसांवर अविश्वास असलेल्या कंगना राणावत व्वा रे व्वा, ह्यांना Y काय Z सुरक्षा दिली पाहिजे. या भाजपच्या पोपट आहेत, भाजपच्या मुखातील बोलत आहेत, उद्या या विधानपरिषद किंवा राज्यभेवर भाजपकडून सभागृहात दिसतील तर नवल वाटायला नको. अस वडेट्टीवार म्हणाले आहेत.

You might also like