साहोमधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित

साहोमधील ‘आयो मेरा सैय्या सायको’ गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यांमध्ये प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून येत आहे. साहो चित्रपटाच्या निमित्ताने प्रभास आणि श्रद्धा ही जोडी पहिल्यांच स्क्रीन शेअर करणार आहे. ‘सायको सैय्या’ या गाण्यातून प्रभास आणि श्रद्धा यांच्या भन्नाट केमिस्ट्रीची कल्पना येते. या गाण्यात प्रभास आणि श्रद्धा एका क्लबमध्ये नाचताना दिसत आहेत.

‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. १४ ऑग्सट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

‘आयो मेरा सैय्या सायको’