चाहत्यांना जखमी करणाऱ्या रणवीरचा माफीनामा; म्हणाला…

णवीर सिंगच्या अतिउत्साही कृत्यामुळे काही चाहते जखमी झाले. कार्यक्रमात स्टेजवर गाणं गात असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक त्याने चाहत्यांच्या गर्दीत उडी मारली. रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.  गर्दीत अचानक उडी मारल्याने काही चाहतेसुद्धा जखमी झाल्याचं समजतंय. या घटनेत काही महिलासुद्धा जखमी झाल्याचं कळतंय.

अनेकांनी त्याच्यावर टीकासुद्धा केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर रणवीरने प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात रणवीरच्या एका फॅनक्लबने त्याला ट्विटवर मेसेज केला असता त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली. ‘यापुढे मी काळजीपूर्वक वागेन. तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद,’ असा रिप्लाय रणवीरने दिला.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like