काजोल साकारणार जयललिता यांची भूमिका ?

सध्या बायोपिकची चलती आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता व त्यांची सहकारी शशिकला यांच्या जीवनावर आधारित एक चरित्रपट येत असल्याचे समजले असून या चित्रपटात भूमिका करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री काजोल व अमला पॉल यांना विचारण्यात आले आहे.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटांवर सध्या अनेक निर्माते काम करत आहेत. एका चित्रपटात कंगना जयललिता यांची भूमिका साकारत असून हा चित्रपट विजय दिग्दर्शित करणार आहेत. ‘आयर्न लेडी’ असाही एक चरित्रपट यांच्या आयुष्यवर येत असून यामध्ये अभिनेत्री नित्या मेनन झळकणार आहे. हा चरित्रपट प्रियदर्शिनी दिग्दर्शित करणार आहे. निर्माते गौतम वासुदेव मेनन सुद्धा जयललितांच्या जीवनप्रवासावर आधारित एक वेब सीरिज दिग्दर्शित करत आहेत.

सगळ्या गोष्टी योग्य जुळून आल्या तर ऑगस्ट २०१९ मध्ये शूटिंग सुरु करण्याचा रेड्डी यांचा मानस आहे. सध्या त्यांचे सहकारी चित्रपटासाठी लागणारे संशोधन करत आहेत.

You might also like