‘सूर्यवंशी’बद्दल रोहित शेट्टी केला नवा खुलासा!!

‘सिम्बा’नंतर प्रत्येकजण रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’ची प्रतीक्षा करत आहेत. रोहितचा हा चित्रपट खास असणार आहे, कारण अक्षय कुमार रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदा काम करणार आहे. ‘सूर्यवंशी’त अक्षय कुमार एका एटीएस अधिका-याची भूमिका साकारताना दिसणार आहे. तूर्तास या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे.

‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयच्या अपोझिट कॅटरिना कैफ दिसणार, अशी खबर होती. पण ताज्या बातमीनुसार, कॅटरिनाने हा चित्रपट धुडकावून लावला आहे. याचे कारण म्हणजे, चित्रपटात हिरोईनला काहीही वाव नव्हता आणि निव्वळ शो पीस म्हणून वावरण्यात कॅटला रस नव्हता. पण आता रोहितने याबाबत एक नवा खुलासा केला आहे.  ‘सूर्यवंशी’मध्ये कॅटरिना असणार आणि तिने हा चित्रपट नाकारला या दोन्ही निव्वळ अफवा असल्याचे रोहितने म्हटले आहे. म्हणजे, या चित्रपटात कॅटरिना नाही, हे स्पष्ट झाले आहे.

मध्यंतरी अक्षयने या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव सुचवल्याची बातमी होती. या चित्रपटामध्ये  फिमेल लीडचा रोल केवळ १५ ते २० मिनिटांचा आहे.आता रोहित अक्षयच्या या इच्छेला मान देतो की आणखी काही वेगळा निर्णय घेतो, ते पाहूच.

महत्वाच्या बातम्या –

You might also like