‘रॉकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘रॉकी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पेपरडॉल एनटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सेवेन सीज् व ड्रीम् विव्हर प्रोडक्शन्स निर्मित ‘रॉकी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘रॉकी’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एक जबरदस्त अॅक्शनपट मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झाला आहे.

‘संदीप साळवे’ हा रांगडा तरीही देखणा चेहरा ‘रॉकी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’बागी-२’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक ‘अदनान ए. शेख’ यांनी ‘रॉकी’ च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि प्रेमासाठी संघर्ष करणाऱ्या बेधडक युवकाची कथा ‘रॉकी’ चित्रपटात बघायला मिळणार आहे.

या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे नवीन चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. ॲक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like