रिया चक्रवर्तीला ईडीकडून समन्स; सीबीआयही सज्ज

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली रिया चक्रवर्ती चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. तिला ईडी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यासाठी रियाला 7 ऑगस्टला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रिया आणि तिच्या कुटूंबीयांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे आदित्य ठाकरे धमकी देत आहेत का?

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून काही दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याचा आधार घेऊन ईडीने याआधीच मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला. रियावर सुशांतचे पैसे हडपल्याचाही आरोप आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यास सीबीआय सज्ज झाला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस बिहार सरकारकडून करण्यात आली. ती केंद्र सरकारने स्वीकारली.

‘या’ टीव्ही अभिनेत्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

एवढेच नव्हे तर, सीबीआय तपासाचा मार्ग मोकळा करणारी अधिसूचनाही केंद्र सरकारने जारी केली. त्यानंतर तपासाची सुत्रे हाती घेणार असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली. सुशांत मृत्यू प्रकरणावरून राजकारणही तापल्याने संबंधित घडामोडींचे महत्व वाढले आहे.

You might also like