रिया चक्रवर्तीने मागितली अमित शाह यांची मदत….

१४ जून रोजी सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.  दरम्यान अनेकांनी सुशांत सिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये आता सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचाही समावेश झाला आहे. रिया चक्रवर्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे. इतकं मोठं पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचं असल्याचं रियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रिया चक्रवर्तीने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आदरणीय अमित शाह सर…मी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती…सुशांत सिंगच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. पण न्याय मिळावा यासाठी आपण सीबीआय चौकशीचा आदेश द्यावा अशी हात जोडून विनंती आहे. हे पाऊल उचलण्यासाठी सुशांतवर कोणता दबाव होता हे मला जाणून घ्यायचं आहे”. रियाने आपल्य ट्विटमध्ये सत्यमेव जयते हॅशटॅगही वापरला आहे. रियाने ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही केली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती नेटक-यांच्या निशाण्यावर आहे. रिया सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांतच सुशांतने आत्महत्या केली. त्यामुळे अनेकजण सुशांतच्या आत्महत्येला रियाला जबाबदार धरत आहेत.मुंबई पोलिसांनीसुध्दा याप्रकरणी तिची कसून चौकशी केली होती.

सुशांतच्या आत्महत्येनंतर आता रियाला तुझ्यावर बलात्कार करु , आत्महत्या कर…नाहीतर तुझा खुन करु अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याचा स्क्रिनशॉट नुकताच तिने शेअर केला आहे.रिया म्हणते, मला गोल्ड डिगर म्हटलं…मला खूनी म्हटलं …मी गप्प राहिले …अनेक आरोप झाले गप्प राहिले…आता माझ्यावर बलात्कार करण्याचा व माझा खून कण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. यासोबतच रियाने पुराव्या दाकल एक स्क्रिनशॉटसुध्दा शेअर केला होता.

 

You might also like