रितेशने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, म्हणतोय…

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून संबंधित क्षेत्र प्रतिबंधित केला जातो. त्यामुळे, सगळीकडे त्याचीच चर्चा होते.

तर, लॉकडाऊन, कोरोना, क्वारंटाईन हे शब्दही आता रोजच्या जगण्याचा भाग झालाय. यावरुन अनेक मिम्स तयार केले जातात आता अभिनेता रितेशन देशमुखने असाच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

रितेश हा सोशल मीडियातूनही तो सातत्याने काही ना काही शेअर करत असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही कोरोनाचीच चर्चा असल्याचे दिसून येते.अनेक ठिकाणी या कोरोनावरुन भीती अन् गंमत पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडिओ रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मराठीत गंमतीशीर असे सवांद आहेत.

रितेश हा बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी तो मराठीशी त्याची जुळलेली नाळ नेहमीच पाहायला मिळते. त्यामुळे, मराठी सिनेमातही त्याने आवर्जुन काम केलंय. या व्हिडिओमध्ये देखील मराठी ह्युमर हे कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर केला आहे. या लय भारी व्हिडिओला नेटीझन्सने चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय.

 

You might also like