रितेश-जेनेलियाचं नव्या क्षेत्रात पदार्पण; जाणून घ्या…

देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. या लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम उद्योग, व्यवसाय तसेच शिक्षण क्षेत्रावर पण दिसून आला. काहींच्या रोजगारावर गदा आली आहे. यामध्येच अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी नव्या व्यवसायात पदार्पण करणार आहेत.

रितेश आणि जेनेलिया देशमुख या दोघांनीही मिळून प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ‘इमॅजीन मीट्स (Imagine Meats) या नावाने नव्या प्रॉडक्शनची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा जरी मांसाहारी पदार्थ वाटत असला तरीदेखील प्रत्यक्षात तो मांसाहारी पदार्थ नसून शाकाहारी पदार्थ असतो. केवळ त्याला मांसाहारी पदार्थाचं रुप दिलं जातं. प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शनमध्ये पालेभाज्या किंवा अन्य शाकाहारी पदार्थ मांसाप्रमाणे भासतील या पद्धतीने तयार केले जातात. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.

दरम्यान, जवळपास एका वर्षापासून या प्रकल्पावर काम सुरु असून लवकरच हे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार असल्याचं रिेतेश- जेनेलियाने सांगितलं आहे.

 

You might also like