रितेशने शेअर केला एक व्हिडीओ; व्हिडीओमुळे रितेश ट्रॉल

इंटरनेटवर सध्या एका सिंहिणीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यात एक सिंहीण मोठ्या ताकदीने ४-५ माणसांना दोरखंड खेचण्याच्या शर्यतीत हरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ  रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येत आहे.

हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयामधील आहे. यात काचेच्या पलिकडे काही माणसे उभी असून त्यांच्या हातात एक दोरखंड आहे. या दोरखंडाचं दुसरं टोक सिंहिणीच्या जबड्यात असून ती मोठ्या शर्थीने हा दोरखंड खेचत आहे. तर तिच्याप्रमाणेच काचेपलिकडे असलेले लोकही तो दोरखंड मोठ्या ताकदीनिशी खेचत आहेत. हा व्हिडीओ रितेशने शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

मुक्या जनावरासोबत असं अमानवीय कृत्य करणं चुकीचं असून त्याचे व्हिडीओ शेअर करणं हे एखाद्या दिग्गज कलाकाराला शोभत नाही असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तसंच अनेकांनी रितेश तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही म्हटलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सिंहिणीच्या धाडसाचं आणि जिद्दीचं कौतूक केलं आहे. तर अनेकांनी एका मुक्या जनावरासोबत असं वागणं अत्यंत चुकीचं आहे असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

Singham

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

You might also like