रितेश व जेनेलिया यांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझा देशमुख यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दोघांनी याबद्दलची माहिती दिली.

“रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो.  डॉक्टर दिनाचं औचित्य साधत आम्ही आमचे अवयव दान करण्याचा निर्णय घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही डॉ. नोझर शेरिअर आणि FOGSI चे आभार मानतो. एखाद्याला सर्वोत्तम भेट द्यायची असेल तर जीवनदान हीच भेट सर्वोत्तम असू शकतो. या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुम्हीसुद्धा अवयवदान करा”, असं आवाहन दोघांनी केलं आहे.

 

You might also like