रितेश देशमुखन आणि जेनेलिया देशमुख यांनी सरोज खान यांना वाहिली श्रद्धांजली

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करीत आहेत. अभिनेता रितेश देशमुखन आणि जेनेलिया देशमुख यांनी ट्विट करत सरोज खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सरोज खान यांच्या जाण्याने बॉलिवूड इंस्ट्रीला खूप मोठा लॉस झाला आहे. त्यांनी आजवर २००० पेक्षा जास्त गाणी कोरिओग्राफ केली आहेत. मी अलादीन या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी या चित्रपटातील गाणे कोरिओग्राफ केले होते. त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली आहे या आशयाचे ट्विट रितेशने केले आहे.

You might also like