खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांच्या आजारपणाविषयी केला मोठा खुलासा

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या आजारपणाविषयी एक मोठा खुलासा केला आहे. २०१८ च्या सप्टेंबर महिन्यापासून ते अमेरिकेत उपचारासाठी आहेत. तेव्हापासूनच त्यांच्या आजारपणाविषयी बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं.
ऋषी कपूर यांचे बंधू, अभिनेते रणधीर कपूर आणि पत्नी नीतू कपूर यांनीही त्यां च्या आजारपणाविषयीची माहिती देत त्यांना कॅन्सर नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वातावरणात आता खुद्द ऋषी कपूर यांनीच आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे.
‘माझ्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मी आशा करतो की लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन मी मायदेशी परतेन. ही सारी प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि सहनशीलता, संयमाची परीक्षा पाहणारी आहे आणि माझ्यासाठी हे जरा कठीणच’, असं ते म्हणाले. येत्या काळात आपण कोणत्याही आगामी चित्रपटाच्या विचारात नसून मनशांतीला महत्त्व देणार असल्याचं ते ‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- एक नजर ‘ठाकरे’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर
- राकेश शर्माच्या बायोपिक मध्ये ‘या’ अभिनेत्याची वर्णी
- एक नजर ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर
- ‘ठाकरे’ला लागले पायरसीचं ग्रहण