‘या’ कारणामुळे रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

रिंकू राजगुरू आगामी ‘कागर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता प्रेक्षकांना रिंकूच्या या चित्रपटाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मकरंद माने यांनी ‘कागर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
फेब्रुवारीमध्ये रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं.
मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. पण बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे. निर्मात्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,’ असं रिंकूनं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘ठाकरे’ चित्रपटामुळे ‘या’ सिनेमाने बदलली प्रदर्शनाची तारीख
- वरूण -आलिया दिसणार ‘या’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये…!!!
- ईशा-विक्रांतच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पाहिली का ?
- ‘कृतांत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित