रिचा चड्ढा लग्नाच्या प्रश्नावर बोलली – औषध येईपर्यंत लग्न नाही….

ख्रिसमसवर रिलीज होणाऱ्या ‘शकील’ चित्रपटाची अभिनेत्री रिचा चड्ढा हिला लग्न कधी करणार असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. रिचा म्हणाली की आम्ही सरकारने बनविलेले नियम पाळतो. म्हणून औषध होईपर्यंत शिथिलता नाही अस ती म्हणाली

यावर्षी अचानक कोरोना साथीने सर्व लोकांचे जीवन बदलले आहे. मग तो बॉलिवूड स्टार असो किंवा सामान्य माणूस. २०२० हे वर्ष सर्वांसाठी एक भयानक स्वप्न आहे. पण आता लोकांनी कोरोनाबरोबर राहायला शिकले आहे.  बॉलिवूडमध्ये सध्या विवाहसोहळे सुरू आहेत. यावर्षी बर्‍याच मोठ्या स्टार्सनी लग्न केले. आणि दरम्यान, अशी बातमीही समोर येत आहे की, ‘शकील’ चित्रपटाची अभिनेत्री रिचा चड्ढादेखील बॉलिवूड अभिनेता अली फजल याच्याशी विवाह करणार आहे.

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत रिचाने लग्नाविषयी बोलताना अनेक मोठे खुलासे केले आहेत. लग्नाच्या प्रश्नावर रिचा म्हणाली, “आत्ताच आपण कसे लग्न करू शकतो, कारण सरकारने इथे असेही म्हटले आहे की जोपर्यंत औषधे नाही तोपर्यंत शिथिलता केली जानार नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही धोका घेऊ शकत नाही.

मागील वर्षीही तिने बऱ्याचदा लग्नाची योजना आखली होती, पण तरीही लग्न होऊ शकले नाही,  त्याचवेळी रिचाने स्पष्ट केले की जोपर्यंत प्रवास करण्यास बंदी आहे तोपर्यंत तिचे लग्न होणार नाही कारण तिचे बरेच नातेवाईक परदेशातूनही येत आहेत.

You might also like